पहिला पाऊस पडला नं , की आईची खूप आठवण येते. काय बरं करत असेल ती. आधी पाऊस सुरु झाला कि आईच्या चिंतेची सुरुवात व्हायची. आमचे Rain Coats तयार करणं, पुस्तके भिजू नयेत म्हणूण दफ्तराला छानपैकी cover करणं, शाळेतून घरी आल्यावर पटकन towel ने डोकं पूसणं. मला पावसाळ्यात शिरा आवडायचा, तो करून खाऊ घालणं. आता काय बर करत असेल ती?. आमचे तर नविन पावसाळे सुरु झाले, पण तीच्या साठी तर तो तोच पावसाळा, तीच दारं , त्याच खिडक्या, आणि तीच balcony, फरक एवढाचं कि पाऊस बघत असताना ती तिथे आता एकटी उभी रहात असेल.....
Sunday, May 29, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Post a Comment